डॉ प्रमोद सोनवणे यांचे पालक सभेत जनजागृती
चाळीसगाव – शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गतनुकतीच हिरापुर रोडवरील ग्रेस अकॅडमी शाळेत विद्यार्थी व पालकांसाठी गोवर रुबेला लसीकरण संदर्भात मार्गदर्शन सभा घेणयात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी तळेगाव येथील आरोग्य केन्द्राचे वेद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद सोनवणे हे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांचे स्वागत मुख्याध्यापक विश्वास बारीस यांनी केले.
डॉ.प्रमोद सोनवणे यांनी आपल्या भाषणात गोवर रुबेल लसीकरण बाबत माहिती सांगितली. लसीकरण केल्यास काय फायदे होतात आणि लसीकरण न केल्यास त्याचे दुष्परिणाम काय होऊ? शकतात यासह त्यांनी त्या संदर्भात सविस्तर माहिती आपल्या भाषणात दिली. विद्यार्थ्यांना रोटरी मिलेनियमतर्फे डॉ प्रमोद सोनवणे यांनी एक हजार रूपयांची बक्षीसे वितरित करण्यात आली. या वेळी शाळेतील सर्व शिक्षक व आरोग्य कर्मचारी विठ्ठल चव्हाण, मोहन राठोड उपस्थित होते. सुत्रसंचालन गणेश निकम यांनी केले. तर आभार प्रदर्शन किरण चोरट यांनी मानले. प्रसिद्धीप्रमुख रणधिर जाधव यांनी या उपक्रमाची पालकांमध्ये जनजागृती केली.