जळगाव ।ग्लॅडिएटरनृत्य क्लासेस ग्रुप च्या वतीने महिला दिनानिमित्त सर्वच वयोगटातील महिलांसाठी मोफत नृत्य प्रशिक्षण शिबिराचे करण्यात आले आहे. तीन दिवस चालणार्या या शिबिराची सुरुवात सोमवारी 6 मार्च पासून करण्यात आली आहे. ग्लॅडिएटर डान्स क्लासेस आरटीओ ऑफिस रोड, गणपतीनगर येथे शिबिराचे आयोजान करण्यात आले असून या मध्ये महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. या वेळी नृत्य दिग्दर्शक अखिल तिलकपुरे यांनी महिलांना प्रशिक्षण दिले. यात 90 महिलांनी यामध्ये सहभाग घेतला आहे.
बॉलीऊड ,घुमर चे प्रशिक्षण
बॉलीऊड प्रकारानंतर घूमर, उडी उडी जाए हे गीत तर अंबर सरिया या गीतावर बहारदार नृत्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचप्रमाणे लग्नात डी.जे.च्या तालावर कशा प्रकारे नृत्य करायचे याच्याही टिप्स् देण्यात येत असून प्रत्यक्षात महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. तर नृत्य स्पर्धेत जाताना हावभाव कसे असावे, यासारखे नृत्याचे बारकावेदेखील महिलांना सांगण्यात आले. यामध्ये बंटी मोटे, जॉनी महाजन, नम्रता पेंढारकर यांचे सुद्धा नृत्य प्रशिक्षणासाठी सहकार्य मिळत आहे. अनेकदा महिलांना नृत्याची आवड असते, परंतु आपल्या घरगुती व्यापामुळे त्यांना हा छंद जोपासता येत नाही. महिला दिनानिमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आल्या असल्याची माहिती अखिल तिलकपुरे यांनी दिली आहे.