ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत हिंजवडीची श्रावणी ‘बेस्ट’

0
पिंपरी-चिंचवड : येथील श्रावणी नियोगी हिने ‘ग्लॅमॉन मिस इंडिया 2018’ स्पर्धेच्या अंमित फेरीत धडक मारून ‘मिस बेस्ट टॅलेंट’ हा किताब पटकावला. दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत देशभरातील 25 राज्यातील एक हजार स्पर्धक सहभागी झाले होते. अंतिम फेरीत 35 स्पर्धक पोहोचले होते. यामधून निवडलेल्या पाच युवतींमध्ये तिचा समावेश होता. ग्लॅमॉन इंडियाने ही स्पर्धा आयोजित केली होती. अंतिम फेरीवेळी अभिनेत्री रविना टंडन, अभिनेता अमन वर्मा, नितू शिवपुरी व अमिता नांगिया उपस्थित होते.
श्रावणी मुळची कोल्हापूरची आहे. मणिपाल विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी घेतली आहे. सध्या ती हिंजवडी आयटी पार्कमधील एका कंपनीत अभियंता आहे. प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्‍वासाच्या बळावर स्पर्धेत ती पहिल्यांदाच भाग घेतला होता. पदार्पणात तिने हा किताब पटकावला. या यशाबद्दल विविध ठिकाणी तिचा सत्कार करण्यात आला. अशाच आणखी स्पर्धांमध्ये सहभागी होवून सर्वोत्तम किताब पटकाविण्याचा मानस असल्याचे तिने सांगितले.