ग्लोबल मॉन्टेसरी प्लस फुटबॉल लीगमध्ये जीएमपी स्कूल विजेती

0

एस्पायर इंडियाच्या सहयोगाने प्री स्कूल फुटबॉल लीगचे केले आयोजन

लीगमध्ये शहरातील सात शाळा झाल्या सहभागी

चिंचवड : पहिल्या ग्लोबल मॉन्टेसरी प्लस (जीएमपी) फुटबॉल स्पर्धांच्या आंतरशालेय अंतिम फेरीचे आयोजन एस्पायर इंडियाच्या सहयोगाने शनिवारी करण्यात आले. यात जीएमपी स्कूल विजेती ठरली आणि त्यांनी के 1 (ज्युनियर केजी) आणि के2 (सीनियर केजी) या दोन्ही वर्गांमध्ये अनुक्रमे अंतर्गत टीम आणि पाठशाळा, बाणेर यांच्या विरोधातले सामने जिंकून विजेती ट्रॉफी पटकावली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी भारतीय फुटबॉल प्रशिक्षक आणि मुंबई एफसीचे व्यवस्थापक हेन्री पिकार्दो उपस्थित होते. जीएमपी फुटबॉल लीगमध्ये सात शाळा सहभागी झाल्या होत्या. त्यात पाठशाळा-बाणेर आणि पिंपळे सौदागर, सीसेम स्ट्रीट-निगडी आणि पिंपळे सौदागर, जेम्स अँड पर्ल्स, रोझ किड्स तसेच आयोजक शाळा-जीएमपी यांचा समावेश होता. जीएमपी फुटबॉल लीग हा एक विशेष उपक्रम असून पुण्यातील विद्यार्थ्यांना खेळात नियमितपणे सहभाग घेऊन सुदृढ स्पर्धा आणि टीम बिल्डिंगसाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा वार्षिक उपक्रम असेल.

शौर्य गुप्ताला परफॉर्मर अ‍ॅवॉर्ड
विजेत्या ट्रॉफीबरोबरच के1 आणि के2 जीएमपीमधल्या शौर्य गुप्ता आणि हीत करिया यांना कन्सिस्टंट परफॉर्मर अवॉर्ड तसेच के1 आणि के2 जीएमपीमधल्या अनुक्रमे आरूष पटेल आणि आयांश केसवानी यांना प्लेयर ऑफ दि टुर्नामेंट पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या फुटबॉल लीगला प्रचंड उत्साह आणि आनंदात सुरुवात झाली आणि प्रत्येक टीम सदस्याने आपल्या टीमचा उत्साह वाढवला. हे सामने शाळेच्या गच्चीवरील क्रीडा सुविधेत खेळवण्यात आले. मुलांमधील संघभावना आणि निरोगी आक्रमकता यांच्यामुळे मुलांना एक चांगला अनुभव मिळतो जिथे कौशल्य आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी एकत्र येतात. जीएमपी शाळेतल्या एका खेळाडूची आई प्रियंका वर्मा म्हणाल्या की, या सुंदर उपक्रमासाठी मी शाळेचे अभिनंदन करते आणि मला आशा वाटते की, शाळा विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे उपक्रम सुरू ठेवेल. या वयात त्यांना खेळाची ओळख करून देणं ही एक उत्तम कल्पना आहे आणि मला माझ्या मुलीने यात ज्या पद्धतीने सहभाग घेतला हे पाहून खूप आनंद झाला. प्रशिक्षण, व्यावसायिक पद्धतीने आयोजन आणि शिक्षक तसेच कर्मचार्‍यांनी हे ज्या पद्धतीने चालवले हे पाहून मला खूप छान वाटले.

खेळ अभ्यासक्रमाचा भाग
आपले विचार व्यक्त करताना ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. अमिता व्होरा म्हणाल्या की, खेळ हा आमच्या अभ्यासक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. या अभ्यासक्रमात असे खेळ आणि उपक्रम समाविष्ट आहेत जे विद्यार्थ्यांना आपल्या सुरुवातीच्या काळात सर्वांगीण वाढीला चालना देतात. आमचे विद्यार्थी फुटबॉलबरोबरच नेमबाजी, बास्केटबॉल, बॅडमिंटन आणि चेसमध्ये रस घेतात. आंतरशालेय फुटबॉल स्पर्धांच्या माध्यमातून आमच्या ग्लोबल मॉन्टेसरी प्लसमधील विद्यार्थ्यांनी आपल्यात निरोगी स्पर्धात्मक कौशल्य तसेच टीमवर्क वाढवले आहे आणि मानसिक विकासाबरोबरच मोटर स्किल्समध्येही विकास घडवला आहे.