बनावट दस्तेवज करून बेहिशोबी मालमत्ता काढल्याप्रकरणी गुन्हा
जळगाव: बनावट दस्तेवज करून 50 लाख रूपयांची बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी ग.स. सोसायटीच्या माजी अध्यक्षासह विभागीय अधिकार्याविरूध्द गुन्हा दाखल करून दोघांना आज शहर पोलीसांनी अटक केली आहे. दरम्यान अटकेच्या या कारवाईमुळे जिल्हा परीषदेसह ग.स.सोसाटीच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ग.स.सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा परीषदेत कक्षाधिकारी म्हणून कार्यरत असलेले सुनील अभिमन सुर्यवंशी हे अध्यक्ष असतांना त्यांनी सोसायटीचे विभागी अधिकारी किरण भीमराव पाटील यांच्याशी संगनमत करून किरण पाटील यांच्या नावाचे बनावट खाते उघडुन अष्टचक्र ठेव योजनेत 50 लाख रूपये ठेव ठेवुन ती नंतर व्याजासह बनावट दस्तेवज करून काढुन घेतली. दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सोसायटीतील अधिकारी व कर्मचार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक जी.एम. ठाकुर यांच्या फिर्यादीवरून ग.स. सोसाटीचे माजी अध्यक्ष सुनिल सुर्यवंशी व विभागीय अधिकारी किरण पाटील यांच्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात बनावट दस्तेवज तयार करून अपसंपादीत मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सुनिल सुर्यवंशी व किरण पाटील या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली असुन पुढील तपास सुरू आहे.