नेरुळ । घणसोली गावाच्या वेशीवरच मुस्लीम वेल्फेअर ट्रस्ट यांना पालिकेच्यावतीने दफनभूमीसाठी भूखंड देण्यात आला आहे. मात्र, या दफनभूमीला घणसोली ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. ही दफनभूमी ही घणसोली गावाच्या वेशीऐवजी घणसोली दर्ग्याशेजारी देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे. या अनुषंगाने सदर दफनभूमीला देण्यात आलेला भूखंड रद्द करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तेव्हा या प्रकरणात महापौर जयवंत सुतार यांनी हस्तक्षेप करावा आणि सदर विषय महासभेत ठराव मांडून तो भूखंड रद्द करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तेजस पाटील यांनी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर घणसोली विभागातील सर्व नगरसेवकांनीही हा विषय महासभेत उचलून धरावा व हा भूखंड रद्द करावा, अशी मागणी करावी यासाठीदेखील तेजस पाटील यांनी घणसोली विभागातील सर्व नगरसेवकांना पत्र दिले आहे.