घरकुलाचा अंतिम हफ्ता अदा न केल्यास छेडणार आंदोलन

0

शिरपूर । सन 2014-15 मध्ये इंदिरा आवास योजनेच्या माध्यमातून घरकुले मंजूर करून दिलीत मात्र अजूनही त्या संदर्भातील शेवटचा रु.25 हजाराचा हप्ता त्यांना मिळालेला नाही, याबाबत येथील भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांच्यासह आदिवासी बांधवांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बागुल यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे कि या आमच्या गरीब आदिवासी बांधवांनी कष्ट मजुरी करून बँकेतून कर्ज घेऊन घरे पूर्ण केली आहेत. आदिवासी अतिबहूल शिरपूर तालुक्यात आपल्या प्रशासनाच्या चुकीमुळे तब्बल 200 अधिक लाभार्थींना शेवटचा हप्ता अदा झालेला नाही. तीन वर्षापासून लाभार्थी पंचायत समिती शिरपूर येथे चकरा मारत आहेत. 15 दिवसांत या गोर-गरीब आदिवासी बंधूंना न्याय मिळवून द्यावा अन्यथा सर्व आदिवासी बंधू भगिनी या ठिकाणी आमरण उपोषणास बसातील असा सज्जड इशारा दिला आहे. यावेळी मिलिंद पाटील, पं.स.सदस्य सखाराम पावरा, विश्वास पावरा, महेश चौधरी, संदीप देशमुख, जगदीश पावरा बुटीबाई पावरा, मुंगीबाई पावरा, शिवा पावरा, प्रकाश पावरा, जामसिंग पावरा, लालसिंग पावरा, गुंजार भिल, सुक्राम पावरा व ग्रामस्थ उपस्थित होते.