रावेर तालुक्यातील 43 लाभार्थींना पहिला हप्ता मिळाल्यानंतर कामास ‘खो’
रावेर- तालुक्यातील ग्रामीण भागातील 43 घरकुल लाभार्थीनी प्रथम हप्त्याचे पैसे घेऊन सुध्दा बांधकामास सुरुवात न केलेल्यांवर पंचायत समिती प्रशासनाकडून फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 37, रमाई घरकुल योजनेचे चार व शबरी घरकुल योजनेंतर्गत दोन अशा एकूण 43 लाभार्थांनी या योजनेंर्तगत पहिला हप्ता घेतला आहे परंतु प्रत्यक्षात कामास सुरुवात केलेली नाही. जिल्हा परीषदेत 4 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांच्या समक्ष घरकुल योजने संदर्भात बैठक झाली. तालुक्यातील घरकुलाचा आढावा घेतला असता 43 घरकुल लाभार्थीनी पैसे घेऊन कामाला सुरुवातच केली नसल्याचे उघडकीस आले. रावेर तालुक्यात घरकुल संदर्भात संपर्क अधिकारी नेमण्यात आले असून त्यात प्रभारी गटविकास अधिकारी एच.एम.तडवी, प्रभारी उपविभागीय अधिकारी जिल्हा परीषदेचे चंद्रशेखर चोपडेकर, पंचायत समिती शाखा अभियंता, कनिष्ट अभियंता, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) स्थापत्य अभियंता, गृह निर्माण अभियंता यांचा सहभाग आहे.