जळगाव : अट्टल घरफोडे जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून त्यांच्याकडून कारसह चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. अरविंद उर्फ आरु अरुण वाघोदे (25, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) व अनिल रमेश चौधरी (40, रा.अयोध्या नगर, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गस्तीदरम्यान संशय आल्याने आरोपी अडकले जाळ्यात
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचार्यांचे पथक एमआयडीसी परीसरात गस्तीवर असताना संशयीत अनिल चौधरी व अरविंद वाघोदे यांना यांच्या वाहनातील संशयास्पद हालचाली पाहून थांबवल्यानंतर त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्यानंतर
वाहनाची झडती घेतली असता त्यात घरफोडीसाठी लागणारे साहित्य आढळल्याने या साहित्यासह कारही जप्त करण्यात आली. अटकेतील संशयीत पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.