घरफोडीतील आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ : जळगाव एमआयडीसी पोलिसांना घरफोडीच्या गुन्ह्यात वॉण्टेड असलेल्या आरोपीच्या भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. गोविंदा रवींद्र बाविस्कर (रा.श्रीराम नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जळगाव येथील घरफोडीच्या घटनेसंदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून यातील संशयीत आरोपी गोविंदा रवींद्र बाविस्कर हा भुसावळ शहरात आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याच्या रविवारी सकाळी श्रीराम नगर भागातून मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीस अधिक कारवाईसाठी त्यास जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, हेडकॉन्स्टेबल गफ्फार तडवी यांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोनामथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी यांनी केली आहे.