जळगाव । शहरातील कासमवाडी अष्टभुजा देवी मंदिरा शेजारील रिक्षाचालकाच्या घरी चोरट्याने डल्ला मारीत 27 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घटना 16 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता उघउकीस आली होती. मात्र, या घटनेतील संशयित चोरट्यास एमआयडीसी पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या सहा तासातच पकडण्यात यश आले होते. संशयित हा पोलिसांच्या कस्टडीत असून त्याने चौकशी दरम्यान पोलिसांना 400 ग्रॅम वजनाचे चांदिचे तीन जोड कडे, एक मोबाईल असा 22 हजार रुपयांचा मुद्देमाल काढून दिला आहे.
27 हजार रुपयांचा ऐवजा डल्ला
कासमवाडी परिसरातील अष्टभुजादेवी मंदिराच्या शेजारी गोपाळ भास्कर कुंवर (वय-38) वास्तव्याला आहे. 15 एप्रिलला साडेदहा वाजेच्या सुमारास कुंवर कुटूंबीय जेवण अटोपुन झोपले. मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्याने खडकीतून हात घालून दाराची कडी उघडली. घरात प्रवेश केल्यावर घरातील कपाटातील 400 ग्रॅम वजनाचे चांदिचे तीन जोड कडे, 5हजार रुपये रोख, 2 हजार रुपयांचा मोबाईल असा एकुण 27 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. सकाळी उठल्यावर दार उघडे दिसले, घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. यानंतर गोपाळ कुंवर यांनी तक्रार दिल्यावरुन औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
चोरटा पोलिस कोठडीत
डिवायएसपी सचिन सांगळे, पोलिस निरीक्षक सुनिल कुर्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचे तपासीधिकारी सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील तसेच नितीन बाविस्कर, किशोर पाटील, कळसकर, मनोज सुरवाडे आदी पोलिस कर्मचार्यांनी घरफोडी झाल्यानंतर अवघ्या सहा तासातच संशयित चोरटा हर्षवर्धन उर्फ शिवा सुधाम पवार अटक केली. त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. दरम्यान, त्याने घरफोडी केल्याची कबूली दिली आहे.
दागिने, मोबाईल हस्तगत
पोलिस कस्टडी दरम्यान पोलिसांनी घरफोड्या हर्षवर्धन उर्फ शिवा सुधाम पवार याची कसून चौकशी केली असता त्याने घरफोडीची कबूली देत. चोरी गेलेल्या ऐवजापैकी400 ग्रॅम वजनाचे चांदिचे तीन जोड कडे, एक मोबाईल असा 22 हजार रुपयांचा मुद्देमाल काढून दिला आहे. पवार याच्याकडेन आणखी गुन्हे उघडकीस येण्याशी शक्यता असून सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील हे गुन्ह्यांचा तपास करीत आहेत.