घरफोडी । धानोरात 6 ठिकाणी तर पंचकला 2 ठिकाणी घरफोड्या

0

धानोरा । अंकलेश्‍वर-बर्‍हाणपुर या राज्य महामार्गावर वसलेल्या धानोरा, पंचक, गावात चोरट्यांनी थैमान घालत, अनेक घरे, दुकाने, दुध डेअरी, आदी ना लक्ष करित लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला असल्याची धक्कादायक, घटना घडली आहे. याबाबत अधिक असे की, पंचक येथे मुख्य चौकातील पाण्याच्या टाकीजवळील पंचक दुधउत्पादक संस्थेत डॉवरमधिल 5 हजार रुपये, तसेच गावातीलच, सुरेश हिरामण पाटिल यांच्या किराणा दुकानातुन 5 हजार रुपये तसेच तेलाचे डबे किराणा माल चोरट्यांनी चोरुन नेला. धानोरा येथील लक्ष्मीनगरमधील संजय आनंदा महाजन यांचे दत्त कृषी केंद्राचे शटर कुलूप तोडून चोरटयांनी आत प्रवेश केला मात्र त्यांना त्या ठिकाणी काहीच न मिळुन आल्याने त्यानी पुढील मोर्चा तेथुनच पुढे स्वामी मेडिकल कडे वळविला. येथील गल्यातील सात हजार रुपये चोरून नेले.

अडावद पोलिसात अद्याप नोंद नाही
त्यानंतर अडावद येथिल मुजाहीत पिंजारी यांचे भारत टेड्र्स मधुन 13 हजार रुपये चोरले तर पुढील नवजिवणकेला एजन्सीचे शटर आणी कुलूप तोडून चांदीची देवीची मुर्ती, हजार रुपयांची चिल्लर, जिर्ण झालेल्या 10 हजार रुपयांच्या नोटा आधी ऐवज लुटून नेला. पुढे चोरट्यांनी जळगाव रोडावरील किशोर चौधरी यांच्या मालकीचे चौधरी टेर्ड्स मधुन अडीच हजार रुपये चोरुन नेले. चोरटयांनी दोन्ही गावात चोरी करण्याची एकच पध्दत वापरली असल्याचे दिसुन येते. अद्याप इतक्या चोर्‍या होऊनही अडावद पोलिस स्टेशनला कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे समजते. धानोरा पोलिस पाटिल दिनेश पाटिल व पंचक येथिल पोलिस पाटिल सतिष वाघ यांनी घटनेची माहिती पोलिस स्टेशनला कळविल्याची माहिती दिली. वरिल दोन्ही गावाच्या घटनेतुन लाखो रुपयाचा ऐवज लुटून नेल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी बीट हवालदार विठ्ठल धनगर, रविंद्र साळुंखे यांनी येवून पाहणी केली.