2024 ऑलिम्पिकसाठी इ स्पोर्टसचा समावेश होण्याची शक्यता
नवी दिल्ली । ऑलिम्पिक ऑनलाईन गेम्सच्या अर्थकारणात दरवर्षी कैकपटीने वाढ होत असलेली पहायला मिळत आहे. ऑनलाईन गेम्सला मिळत असलेला पाठिबा बघून 2024 मध्ये होणार्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ई स्पोर्ट्सचा समावेश करण्याच्या पहिल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. 2018 मध्ये इंडोनेशियात होणार्या आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान ऑनलाइन गेम्स खेळवण्यात येणार आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान प्रायोगिक तत्वावर ऑनलाइन गेमचे सामने खेळवण्यात येतील. हा प्रयोग यशस्वी झाल्यास 2022 मध्ये हाँगजोए क्रीडा स्पर्धांमध्ये मेडल स्पोर्ट्स म्हणून ऑन लाईन स्पोर्ट्स खेळवण्यात येतील. याचाच अर्थ ऑनलाइन गेम जिंकणार्यांना पदके देण्यात येतील.
ऑलिम्पिकच्या दिशेने इ स्पोर्टसची वाटचाल
इतर ऑलिम्पिक खेळांच्या तुलनेत ई स्पोर्टस्चा झपाट्याने झालेला प्रसार हे आगामी आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये या खेळांचा समावेश करण्याचे प्रमुख कारण सांगितले जात आहे. ऑनलाईन गेम्सच्या अर्थकारणात दरवर्षी 41 टक्क्याची वाढ होत आहे, याशिवाय तिन वर्षांमध्ये 12.5 टक्क्यांनी हे खेळ बघणार्यांची संख्या वाढली आहे. ऑन लाईन स्पोर्टसला मिळणारा वाढता प्रतिसाद त्याला ऑलिम्पिक स्पर्धांकडे खेचत आहे. वेळ मिळताच हातातल्या स्मार्टफोनवर विविध खेळांमध्ये आपला हात अजमावत असलेली लोक पहायला मिळत आहे.
एनबीएची इ स्पोर्टस लीग
श्रीकांतने अमेरिकत एनबीएनतर्फे इ स्पोर्ट्स लीग खेळवण्यात येणार आहे. या लीगमध्ये आठ ते 12 संघ सहभागी होतील. प्रत्येक संघात पाच खेळाडू असतील. या लीगमध्ये सहभागी होणार्या खेळाडूस प्ले ऑफ आणि चॅम्पियनशिप असे मिळून 82 सामने खेळावे लागतील. यावर्षी टोरंटोमध्ये कॉल ऑफ ड्यूटी : इनफिनीट वॉरफेअर इ स्पोर्ट्स व्हीडिओ गेम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
हे कारण सुद्धा आहे
ई स्पोर्ट्सच्या तुलनेत ऑलिम्पिकमधील सामने बघणार्यांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. लंडन ऑलिम्पिकच्या तुलनेत रिओ ऑलिम्पिकदरम्यान प्राइम टाईममध्ये सामने बघणार्या 18 ते 49 वर्षे वयाच्या चाहत्यांची संख्या 25 टक्क्यांनी कमी झाली होती. ऑनलाईन गेम्सच्या अर्थकारणाने मागील तीन वर्षांमध्ये 4461 कोटी रुपयांचा पल्ला गाठला आहे. या शिवाय या तिन वर्षांच्या काळात हे गेम्स बघणार्यांची संख्या 12.5 टक्क्याने वाढली आहे. त्यामुळे आशियाई ऑलिम्पिक कॉऊंसिलने इ स्पोर्ट्सचा आशियाई क्रीडा स्पर्धेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.