घरबसल्या रद्दीपासून कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण

0

शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशनचा उपक्रम

रावेत : महिलांना घरबसल्या रोजगार मिळावा यासाठी नगरसेविका करूणा चिंचवडे यांच्या माध्यमातून ‘शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन’ने रद्दीपासून कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमात चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी पसिरातील तुळजाई बचत गट रजनीगंधा हौसिंग सोसायटी यांनी प्रथम पुढाकार घेतला. या उपक्रमात सुविधा इंगळे, कल्याणी महाजन, शीतल काकडे, संगीता पोळ, किरण चव्हाण, अनुजा जगताप, जयश्री खडकीकर, रोहिणी बेडसे, स्मिता पाटील, सीमा पाठक,सविता पाटील, अमृता चौधरी, सुनीता दुधाळ, कविता धनगर, माधुरी खडसे, सुरेखा कांबळे, मीरा जगताप, कोमल ढवळे या महिला भगिनींनी प्रशिक्षण घेतले.

प्लास्टिक पिशव्या टाळा
प्लास्टिक पिशवी वापर टाळण्याचा कृतीतून सामाजिक संदेश वाल्हेकरवाडी पसिरातील महिलांनी दिला. प्लास्टिक बॅग न वापरण्याचा नारा येणार्‍या काळात प्लास्टिक पिशवी बंदी महाराष्ट्र शासन लागू करण्याची शक्यता आहे. यामुळे गेल्या दीड वर्षांपासून फाउंडेशनच्या माध्यमातून चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी परिसरातील महिलांना हाताला काम मिळावे, यासाठी सर्वप्रथम महिला संघटन करीत सलग 85 बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे.

घरबसल्या उत्पन्न
नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या माध्यमातून विविध उपक्रमामध्ये महिलांना जास्तीत जास्त घरबसल्या काम मिळावे आणि त्यांचे अर्थाजन व्हावे, या हेतूने घरबसल्या रद्दीपासून कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण गेले दोन दिवस चालू केले. मोकळ्या वेळात महिला भगिनींनी रद्दीपासून बनवलेल्या कागदी पिशव्या ह्या शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनच्या माध्यमातून प्लास्टिक पिशवी टाळा, पर्यावरण वाचवा या मोहिमेसाठी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात देण्यात येणार आहेत. या उपक्रमाच्या यशस्वी संयोजनासाठी फाउंडेशनच्या बचतगट महासंघाच्या आशा चिंचवडे यांनी परिश्रम घेतले.