घराचा परस्पर ताबा घेतल्याने घरफोडीचा गुन्हा

0

जळगाव । शहरातील यशवंत कॉलनीतील घराचा परस्पर ताबा घेवून कडी-कोयंडा तोडून घरातील सामान परस्पर चोरून नेल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात शुभम पाटील यांच्या विरुध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, चित्रा चौकात राहणारे अरविंद बाऊस्कर यांचा मुलगा कमलेश यांचा मालकीचे यशवंत नगरात दुमजली घर आहे. बाऊस्कर यांना पैशाची गरज असल्याने त्यांनी शुभम पाटील या ब्रोकरच्या मार्फतीने घराची सौदापावती महेश गोपालदास बाहेती यांच्याशी केली होती. त्यानंतर घराची पक्की सौदापावती सन-2017 साली शुभम पाटील याच्या मार्फतीने केली होती. सौदापावती केल्यावर टोकनची रक्कम महेश बाहेती यांनी शुभम पाटील यास दिली होती. परंतू ती रक्कम शुभम याने बाऊस्कर यांना दिली नाही. त्यानंतर शुभम याने घर महेश बाहेती यांना खरेदी करून देण्यासाठी तगदा लावला म्हणून बाऊस्कर यांनी अगोदर टोकनचे पैसे द्या. त्यानंतर खरेदी करून असे सांगितले होते. दरम्यान महेश बाहेती यांनी शुभम याला घरासाठी 22 लाख रुपये दिले असल्याचे बाऊस्कर यांना सांगितले. त्यानंतर शुभम याने बाऊस्कर यांना तीन चेक दिले. परंतू मी खात्यात पैसे टाकेल त्यावेळी चेक टाका असे सांगितले होते. परंतू खात्यात शुभमने पैसे टाकले नसल्याने बाऊस्कर यांना चेक वटविण्यात आले नाही.

बाऊस्कर बाहेरगावी जाता काढला सामान
बाऊस्कर पुणे येथे गेल्याने शुभम याने यशवंत नगरातील घराचे कुलुप तोडून घरातील 5 हजार रुपयांची बजाज स्कुटर, 10 हजार रुपयांचा सोफासेट, 2 हजार रुपयांचा सागवानी खुर्चा, 15 हजार रुपयांचे दिवान व गाद्या, 1 लाख 80 हजार रुपयांचे दागिने, 30 हजार रुपयांच किंमतीचा टिव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, जवळपास 46 हजार रुपयांचे कपडे असा जवळपास 2 लाख 88 हजार रुपयांचा सामान परस्पर लांबवून नेला. अरविंद बाऊस्कर यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात शुभम सुनिल पाटील यांच्याविरुध्द भादवी कलम 380, 454, 457 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पीएसआय मनोज वाघमारे करीत आहे. दरम्यान पोलिसांनी शुभम पाटील याला अटक केली आहे.