पिंपरी चिंचवड : घराचे कुलूप तोडून चोरट्याने 49 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 25) सकाळी दहाच्या सुमारास बिजलीनगर, चिंचवड येथे उघडकीस आली. मनीष मनोहर भुजबळ (वय 50, बिजलीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनीष यांचे घर सोमवारी रात्री दहा ते मंगळवारी सकाळी दहा या वेळेत बंद होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील 49 हजार 500 रुपये किमतीचे 31 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घटना उघडकीस आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शेवाळे तपास करीत आहेत.