घराचे डिपॉझिट भरण्यासाठी दहा लाख रुपये न आणल्याने विवाहितेचा छळ

Harassment of a married woman in Faizpur for ten lakhs यावल : फैजपूर शहरातील माहेर असलेल्या 21 वर्षीय विवाहितेचा पक्के घर बांधण्यासाठी व बेंगलोर येथे भाडे कराराकरीता घराचे डिपॉझिट भरण्यासाठी दहा लाख रुपये आणावे यासाठी पतीसह चौघांनी विवाहितेचा छळ केला. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर तालुक्यातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघा संशयीतांविरोधात गुन्हा 
फैजपूर शहरातील माहेर असलेल्या 21 वर्षीय हर्षिता गणेश बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा विवाह 4 जून 2022 रोजी गणेश मंगल बाविस्कर (रा.सोमनगाव सुकळी, ता.मुक्ताईनगर) याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर विवाहितेकडे माहेरून गावातील घर पक्के बांधकाम करण्यासाठी तसेच बंग्लोर येथील भाडे तत्वावरील घराचे डिपॉझिट भरण्यासाठी दहा लाख रुपये आणावे म्हणून तिचा शारीरीक आणि मानसिक छळ करण्यात आला. पैसे न आणल्यास तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देण्यात आली. या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार फैजपूर पोलिस ठाण्यात पती गणेश मंगल बाविस्कर, सासरे मंगल श्रावण बाविस्कर, सासू लताबाई मंगल बाविस्कर व दीर पवन मंगल बाविस्कर (सर्व रा. सोमनगाव सुकळी, ता.मुक्ताईनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास फैजपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक उमेश चौधरी करीत आहे.