घरातून 47 हजाराचा ऐवज चोरी

0

आळंदीः  गुरुनाथ लॉज समोरील घरात कोणीही नसताना अज्ञात चोरटयांनी 2 तोळे सोन्याच्या मंगळसूत्रासह 47 हजार रुपयेचा ऐवज अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची माहीत पोलिसांनी दिली. गंगा कैलास घुगे (वय 31,मुळगाव मारसूद,ता.मालेगाव,जिल्हा वसीम,रा.आळंदी गुरुनाथ लॉज समोर,ता.खेड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्रांच्या माहिती नुसार सोमवारी दुपारी पाऊणे एकच्या दरम्यान घरात कोणी नसताना अज्ञात चोरटयांनी कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील 7 हजार रुपये रोख आणि 40 हजार रुपये किंमतीचे 2 तोळे सोन्याचे मंगळसूत्र अशा 47 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालाची चोरी झाल्याचे सांगितले. तपास पोलीस हवालदार महेश साळुंखे करीत आहे.