घरात शौचालय नाही; महिलेचा घटस्फोट मंजूर

0

मेवाड । पती-पत्नीतील वाद किंवा इतर कारणांवरून घटस्फोटासाठीचे अर्ज दाखल केले जातात. मात्र, राजस्थानमध्ये घरात शौचालय नसल्यामुळे कौटुंबिक न्यायालयात दाखल करण्यात आलेला घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्यात आला होता. कोर्टाने अर्जावर सुनावणी करताना घटस्फोट मंजूर केला.

राजस्थानमधील मेवाड येथील भिलवाडामधील एका महिलेने ही घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. महिलेने आपल्या सासरच्या मंडळींना घरात शौचालय बनवण्यासाठी अनेकदा विनंती केली होती. मात्र, सासरच्या मंडळींनी तिची मागणी उडवून लावत मारहाण केली असल्याचे महिलेने सांगितले. मारहाणीनंतर महिलेने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. कोर्टाने महिलेच्या बाजूने निर्णय देत घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला.