घराबाहेर लावलेली दुचाकी चोरट्यांनी लांवबली

A bike worth 30,000 was stolen from ZTC area in Bhusawal  भुसावळ : शहरातील झेडटीसी भागातून चोरट्यांनी 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तालुका पोलिसात गुन्हा दाखल
तक्रारदार आनंद देविदास परदेशी (53, प्लॉट क्रमांक 15, स्नेहनगर, गोंदिया कॅबीन, झेडटीसी, भुसावळ) यांच्या मालकिची हिरोहोंडा दुचाकी (एम.एच.09 सी.टी.0987) 5 रोजी रात्री 9 ते 6 ऑगस्टच्या पहाटे सहा दरम्यान चोरट्यांनी संधी साधून लांबवली. तपास हवालदार प्रेमचंद सपकाळे करीत आहेत.