घरी कोणी नसल्याने जामनेरातील मुख्याध्यापकाच्या घरात चोरी

0

जामनेर। सुटीमुळे बाहेरगावी गेलेल्या मुख्याध्यापकाचे बंद घर फोडून चोरट्यांनी तेरा तोळ्यांचे सोन्याचे दागिने व वीस हजार रुपये रोख असा सुमारे चार लाखांचा ऐवज लांबविला. ही घटना जामनेर येथे घडली. आश्रमशाळेचे मुख्याध्यापक ईश्वर रामदास महाले हे 26 एप्रिलपासून कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते.

शनिवारी ते परत आले. त्यांना घराचा समोरील दरवाजा तुटलेला दिसला. आत पाहिले असता चोरीची घटना उघडकीस आली. तपासासाठी जळगावहून श्वानपथक आणण्यात आले होते. जामनेर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.