घर उघडे असल्याची साधली संधी : 27 हजारांचा ऐवज भुसावळातून लांबवला

अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा : वाढत्या चोर्‍यांमुळे नागरीकांमध्ये पसरली घबराट

27 thousand per day from Nasarwanji file area in Bhusawal भुसावळ : शहरातील नसरवांजी फाईल भागातील रहिवासी महिलेच्या घरातून चोरट्यांनी भर दिवसा 27 हजारांचा ऐवज लांबवल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

भर दिवसा झालेल्या चोरीने खळबळ
तक्रारदार मशिरा रफिक गवळी (26, नसरवांजी फाईल. राजगौंड मंदिराजवळ, भुसावळ) यांच्या घरातून शुक्रवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश करीत अडीच हजार रुपये किंमतीची व एक ग्रॅम वजनाची पोत, बाराशे रुपये किंमतीचे सोन्याचे सहा मणी, अडीच हजार रुपये किंमतीची व एक ग्रॅम वजनाची अंगठी, एक हजार सहाशे रुपये किंमतीच्या लहान मुलीच्या बांगड्या, तीन हजार रुपये किंमतीचे लहान मुलीचे जोडवे याशिवाय कमरकाटा, चांदीचे चाळ, चांदीचे पैंजण, पायातील बेडी असा एकूण 27 हजार 700 रुपयांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी गवळी यांच्या तक्रारीनुसार शनिवारी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहेत.