Thieves stole 11,000 cash from a locked house in Raver City रावेर : शहरातील जुना सावदा रस्त्यावरील माऊली नगरातून चोरट्याने बंद घरातून 11 हजारांची रोकड लांबवली. या प्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
माहितगार चोरट्याचा शोध सुरू
रावेर शहरातील जुना सावदा रोडवरील माऊली नगरात भरत सुरेश पाटील (30) वास्तव्यास असून बुधवार, 7 ते गुरुवार, 8 रोजी रात्री अज्ञात चोरट्याने घराला लावलेले कुलूप तोडून घरात प्रवेश करीत बेडरूममधील पॅन्टच्या मागील खिश्यातील पाकीटातून अकरा हजारांची रोकड लांबवली. या प्रकरणी रावेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस कर्मचारी विष्णू भील करीत आहे.