घाईघाईत आज कोणतीही घोषणा नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

सोलापूर: परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. नुकसानग्रस्त भागाचा आज सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौरा केला. सोलापूर जिल्ह्यापासून मुख्यमंत्र्यांनी दौरा सुरु केला. दरम्यान मुख्यमंत्री आज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी काही तरी भरीव निधीची घोषणा करतील असे बोलले जात होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी घाईघाईत कोणतीही घोषणा न करता संपूर्ण आढावा घेतल्यानंतर मदतीबाबत घोषणा करू त्यामुळे आज कोणतीही घोषणा करणार नाही असे जाहीर केले. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

केंद्र सरकार परदेशातील सरकार नाही
राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. यावरून
विरोधकांनी राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करायला तत्पर नसून सर्व केंद्र सरकारवर ढकलून देत असल्याचे आरोप केले आहे. यावर देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. केंद्र सरकार हे आपल्याच देशातील सरकार आहे, केंद्र सरकार परदेशातील सरकार नाही असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदतीचे आश्वासन दिले आहे, ते नक्कीच मदत करतील असा आशावाद देखील त्यांनी वयक्त केला आहे.