घाटकोपरमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त नारळ तोड स्पर्धा

0

मुंबई: पंतनगर भागात असलेल्या शूरवीर बाजीप्रभु मंडळाच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त नारळ तोड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक सण आणि संस्कृती टिकून राहावी यासाठी मंडळाच्या वतीने या पारंपरिक सणाचे आयोजन करण्यात आले.

यंदाचे मंडळाचे हे 25 वे वर्ष आहे. यावेळी समाजसेवक महेश जंगम, प्रकाश वाणी, चंद्रपाल चंदेलिया, सचिन भांगे, नाना उतेकर, बाळा गोसावी, बबन पवार आणि इतर कार्यकर्ते, विभागातील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नारळ तोड स्पर्धेत मुलींनी देखील सहभाग घेतला होता.