घाटकोपर रेल्वे स्थानकावर 8 व 9 जुलै रोजी ट्रॅफिकसह पॉवर ब्लॉक

0

अनेक गाड्यांच्या मार्गात बदल तर काही गाड्या होणार शॉर्ट टर्मिनेट

भुसावळ- मध्य रेल्वेच्या घाटकोपर रेल्वे स्थानकावर तांत्रिक कामांसाठी 8 व 9 जुलै रोजी ट्रॅफिकसह पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याने काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

अनेक गाड्या धावणार उशिराने : असे आहेत बदल
शनिवार, 8 रात्री 12.45 ते रविवार, 9 जुलै रोजी सकाळी 6.45 दरम्यान सहा तास पाचव्या व सहाव्या रेल्वे लाईनवर पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याने या काळात धावणार्‍या अनेक प्रवासी गाड्या आपल्या निर्धारीत वेळेपेक्षा दिड ते अडीच तास उशिराने पोहाचणार आहेत. 11062 दरभंगा-एलटीटी, 12541 गोरखपूर-एलटीटी, 11016 गोरखपूर-एलटीटी कुशीनगर एक्स्प्रेसला ठाणे रेल्वे स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट केले जाईल. 9 रोजी 12165 एलटीटी-वाराणसी रत्नागिरी एक्स्प्रेस पहाटे 5.23 ऐवजी 6.55 वाजता सुटणार आहे तर 15017 एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेय व्हाया ईलाहाबाद ही गाडी 6.35 ऐवजी 7.05 वाजता सुटेल. 11061 एलटीटी-दरभंगा एक्स्प्रेस 12.15 ऐवजी 2.20 वाजता सुटणार आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.