बिम्स सदस्य देशांचा लष्करी सराव सुरू
खडकी : मागिल काही दिवसांपासुन खडकी, बोपोडी, दापोडीसह पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागात घिरट्या घालणार्या लष्करी हेलीकॉप्टर बाबत नागरीकात प्रचंड उत्कंठा निर्माण झाली होती. त्याचे गुढ अखेर उलगडले गेले आहे. औंध येथील लष्करी तळावर बिम्स टेक सदस्य राष्ट्रांचा संयुक्त लष्करी सराव चालु असुन त्या सरावाचाच एक भाग म्हणुन घिरट्या घालणारे हे लष्करी हेलिकॉप्टर असल्याचे समजते. मागील काही दिवसांपासुन लष्करी हेलिकॉप्टर या भागात कमी उंचीवरुन घिरट्या घालत असल्याचे दिसून येत होते. दर पंधरा मिनीटांनी सकाळी 10 पासुन ते सायंकाळ 4 पर्यंत हे हेलीकॉप्टर घिरट्या घालत असल्याने नागरीकांमध्ये उत्कंठा निर्माण झाली.
हे देखील वाचा
बे ऑफ बंगाल इनिशिएटीव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को ऑपरेशनच्यावतीने दहशदवादाचा सामना करण्याकरिता औंध येथील लष्करी तळावर बिम्सटेक सदस्य असलेल्या राष्ट्रांचा संयुक्त लष्करी सराव सोमवार (दि 10) पासुन प्रारंभ करण्यात आला आहे. या सरावात भारत, भुतान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका या राष्ट्रांचा सहभाग आहे. नेपाळने या सरावातुन ऐनवेळी माघार घेतली. प्रत्येक देशातील 25 जवान व त्यांचे लष्कर प्रमुख या सरावात सहभागी झाले आहेत. ग्रामीण शहरी दहाशतवादाचा बिमोड हा या संयुक्त सरावाचा मुख्य उद्देश आहे. बॉम्ब शोधण्याचे तंत्र अशा अनेक गोष्टींचे प्रात्यक्षिकेही या सरावा दरम्यान होणार आहेत. 16 सप्टेंबर रोजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे,लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्या उपस्थितीत या संयुक्त सरावाचा समारोप होणार आहे.