कोलकाता-काल आसाम राज्यातील घुसखोरांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आता पुढचा नंबर हा पश्चिम बंगालचा असेल असा इशारा भाजपाने दिला आहे. या राज्यातील घुसखोरांचा आकडा कोटींच्या घरात असेल असेही भाकित भाजपाने वर्तवले आहे.
पश्चिम बंगालच्या तरुणांना त्यांच्या राज्यात बांगलादेशमधून किती स्थलांतरीतांनी प्रवेश केला आहे, हे जाणून घ्यायचे आहे. या घुसखोरांमुळे येथील भुमिपुत्रांना रोजगार आणि कायदा सुव्यवस्थेच्या अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भाजपाचा या तरुणांच्या मागणीला पाठींबा असल्याचे भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय नागरिक नोंदणीत (एनआरसी) असाममधील ४० लाख बेकायदा नागरिक आढळून आले आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालची आकडेवारी जाहीर झाल्यास हा आकडा कोटींमध्ये असेल त्यावर सुप्रीम कोर्टाचे लक्ष असल्याचेही सांगण्यात आले आहे.
तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी या प्रकाराचा संसदेत निषेध नोंदवला. पक्षाचे खासदार सुगत रॉय यांनी निवेदन करीत आसाममधील ४० लाख नागरिकांचा बेकायदा नागरिकांच्या यादीत समावेशाच्या मोहिमेला स्थगिती देण्याची विनंती केली होती. तर इतर विरोधी पक्षांनीही राज्यसभेत ही मोहिम थांबवण्याची मागणी करीत गोंधळ घातला.