घुसखोरी करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल -लष्करप्रमुख

0

नवी दिल्ली-आज भारतात सैन्य दिन साजरा केला जात आहे. भारतीय सैन्य दलाच्या गौरव आज होत आहे. दरम्यान दिल्लीत बोलतांना लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी भारतीय जवान विरोधकांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे. घुसखोरी करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही असा इशारा दिला.

तसेच त्यांनी यावेळी बोलतांना सोशल मीडिया हाताळतांना सावधगिरी बाळगली पाहिजे, प्रत्येकाने आपल्या कुटुंबियांपासून सोशल मीडिया वापरताना काळजी घेतली पाहिजे. देशासबंधी माहिती सोशल मीडियाद्वारे पसरविली जाते, त्यावर आवर घातला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच सोशल मिडीयाचा सावधगिरीने वापर करण्याचे आवाहन केले.