जळगाव। घराच्या समोर खाटेवर बसलेल्या तीन वर्षीय चिमुलीचा मोकाट कुत्र्याने चावा घेत लचका तोडल्याची घटना घडली असून चिमुकलीला जिल्हा सामान्य रूग्णालयात कुटूंबियांनी उपचारार्थ दाखल केले आहे. बबिता तुकाराम बारेला असे त्या जखमी चिमुकलीचे नाव आहे.
चोपडा तालुक्यातील घोडसगाव येथील बबीता बारेल (वय-3) ही तीन वर्षीय चिमुकली गुरूवारी 6 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास तीच्या घरा समोर खाटेवर बसली होती. त्यावेळी अचानक त्या ठिकाणी मोकाट कुत्र्याने तिच्या नाकाला चावा घेत लचका तोडला. यात ती खाटेवरून पडून तीच्या पाठिला व डोक्याला इजा झाली. तिला कुटूंबियांनी तीला उपचारासाठी दाखल केले आहे.