भुसावळ- मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव ते चिखली गावादरम्यान मुंबई- नागपूर महामार्गावरुन पायी चालणार्या फासे पारधी कुटूंबाला भरधाव टँकरने धडक दिल्याने मातेसह तीन मुलांचा जागीच करुण अंत झाल्याची घटना रविवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली होती. या अपघातात जखमी झालेल्या निहान गोधन पवार (वय 12) या गंभीर जखमी रुग्णाचे जळगाव उपचारार्थ हलविताना दुपारी निधन झाले. या अपघातात मयत झालेल्यांची संख्या आता पाच झाली आहे. अपघातग्रस्त टँकरचा चालक आशिषकुमार गौर (बिहारगंज, प्रतापगड, बिहार) यास अटक करण्यात आली आहे. दरम्यान, रविवार फासे पारधी कुटूंबावर क्रुर काळ म्हणून आल्याने एकाच कुटूंबातील मातेसह चार मुलांना जीव गमावल्याचीही जिल्ह्यातील पहिलीच घटना ठरली असल्याचे बोलले जात आहे.