घोरावडेश्‍वर देवस्थान परिसराची केली स्वच्छता

0

डी. वाय. पाटील कॉलेजतर्फे राबविला उपक्रम

तळेगावः डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून पर्यावरणाच्या संर्वधनासाठी घोरावडेश्‍वर देवस्थान येथील डोंगर परिसरातील प्लास्टिक व कचरा गोळा करण्यात आला. कॉलेजचे सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी सर्व प्लास्टिक व कचरा गोळा करुन तो घंटागाडीच्या ताब्यात दिला. डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील व डायरेक्टर डॉ. रमेश वस्सपनावर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी सर्व विभागप्रमुख, डॉ. शैलेश चन्नापट्टना, डॉ. मिनिनाथ निघोट, डॉ. अनुपकुमार बोंगाळे, संजय बढे, विठ्ठल वाघ, प्रशांत काठोळे, इम्रान तांबोळी तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

मनाचीही स्वच्छता राखावी
यावेळी कार्यक्रमप्रसंगी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे नगरसेवक रघुवीर शेलार यांनी विद्यार्थ्यांना परिसरासोबत मनाचीही स्वच्छता ठेवली पाहिजे, असे मत व्यक्त केले. प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होत आहे. भविष्यातील धोके टाळण्यासाठी प्लास्टिक वापर बंद केले पाहिजे. तसेच स्वयंशिस्तीने परिसरातील प्लास्टिक व कचरा गोळा करून परिसराचे सौंदर्य जपले तरच भारत खर्‍या अर्थाने स्वच्छ होईल, असे मत प्राचार्य डॉ. अभय पवार यांनी यावेळी व्यक्त केले.