जळगाव। शहरातील चंदूअण्णानगरातील 43 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तालुका पोलिसठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात झाली. रंजना रविंद्र शेजवळ असे मयत विवाहितेचे नाव आहे.
12 रोजी रविंद्र शेजवळ यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ नेले. परंतू वैद्यकीय अधिकार्यांनी रंजना यांची तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. डॉ.सचिन अहिरे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्युची नोंद झाली. घटनास्थळी पो.नि.अशोक रत्नपारखी यांनी भेट दिली. तपास पो.हे. राजेंद्र बोरसे करत आहेत.