मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल महाराष्ट्रात लवकरच नवीन राजकीय समीकरण समोर येईल, मोठी राजकीय घडामोडी घडणार आहे. राज्याच्या राजकारणात वन फाईन मॉर्निंग सारखे अचानक काही तरी घडेल असे भाकीत त्यांनी वर्तविले होते. यावर आज मंगळवारी २९ रोजी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकेल यात शंका नाही, मात्र चंद्रकांत पाटील यांच्या मध्यावधी निवडणुकीवरील भाष्य मी सकारात्मक घेतो, चंद्रकांत पाटील यांच्यावर निवडणूक आयोगाने विशेष जबाबदारी दिली असेल असा चिमटाही राऊत यांनी काढला.
सामना या वृत्तपत्राच्या मुलाखतीसाठी फडणवीस यांची भेट घेतली, ही राजकीय भेट नव्हती, पुन्हा फडणवीस यांची भेट घेईल असेही राऊत यांनी सांगितले. अमित शहा, राहुल गांधी यांचीही मुलखात घेईल असे राऊत यांनी सांगितले.
शिवसेनेचे तरुण नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्यांवरही राऊत यांनी निशाणा साधला. दात उचकटणाऱ्यांचे दात घशात घातले जाईल असा दमही राऊत यांनी भाजप नेत्यांना दिला.