चंद्रपूर जिल्ह्यातील नरभक्षी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

0

नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास

चंद्रपूर: चिमूर, वरोरा तालुक्यातील रामदेगी संगरामगिरी व अर्जुनी परिसरात गेल्या महिनाभरापासून धुमाकूळ घातलेल्या व पाच जणांचा बळी घेतलेल्या नरभक्षी बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला शनिवारी सकाळी यश मिळाले.

गेल्या १५ दिवसात या बिबट्याने सात हल्ले चढविले होते व पाच जणांना ठार केले होते. या परिसरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून प्रचंड भयभीत झाले होते. त्याच्या दहशतीमुळे बोथली, राळेगाव, निमध्येला, वाहनगाव आदी गावातील नागरिक शेतात जाताना घाबरत होते. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने सापळा लावला होता. मात्र तो त्यात अडकत नव्हता. शुक्रवार १४ रोजी या परिसरात लावलेल्या एका पिंजऱ्यात मात्र हा बिबट्या अडकला आणि गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. वनविभागाने बिबट्याला ताब्यात घेतले असून लवकरच त्याला योग्य ठिकाणी सोडले जाणार आहे.