मुंबई :-चंद्रपूर येथे कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोयी सुविधानिर्माण करण्यासाठी राज्य शासन, चंद्रपूर येथील जिल्हा खनिजप्रतिष्ठान आणि मुंबई येथील टाटा न्यास यांच्या सहभागातून खाजगीभागीदारी तत्त्वावर 100 खाटांचे कर्करोग रुग्णालय उभारण्याचानिर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्यात कर्करोगग्रस्त रुग्णांचे प्रमाण लक्षणीयअसून त्यांना उपचारासाठी नागपूर व मुंबई येथे जावे लागते.साधारण आर्थिक परिस्थितीमुळे अनेकदा काहींना उपचार घेणेहीशक्य होत नाही. अशा सर्व रुग्णांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.चंद्रपूर येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे व 500 खाटांचे शासकीयवैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू करण्यात आले असून यासंस्थेसाठी नवीन इमारत बांधण्यात येत आहे. रुग्णालय संकुलासाठीउपलब्ध असणाऱ्या 50 एकर जागेपैकी सुमारे 10 एकर जागेमध्येअत्याधिक उपचारसुविधा असणारे कर्करोग रुग्णालय उभारण्यातयेणार आहे. ही जागा कर्करोग रुग्णालय प्रकल्पासाठी निर्माणकरण्यात येणाऱ्या संस्थेस 30 वर्षासाठी नाममात्र दराने भूईभाड्यानेदेण्यात येणार आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्याअधिपत्याखालील चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वरूग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या कर्करोग रुग्णालयप्रकल्पासाठी सामंजस्य कराराचा मसुदा तयार करण्यासाठी वित्तविभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापनकरण्यात येणार आहे. या समितीत नियोजन व उद्योग विभागाचेअपर मुख्य सचिव, विधि व न्याय विभागाचे प्रधान सचिव तथा विधिपरामर्शी, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव, संबंधितभागिदारी संस्थेने नामनिर्देशित केलेले प्रतिनिधी आणिआवश्यकतेनुसार अन्य सभासदांचा समावेश असेल. कर्करोगरुग्णालय उभारण्यासह त्याच्या संचलनासाठी विशेष कृती समितीची(स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही)) स्थापना कंपनी कायदा-2013मधील तरतुदींनुसार करण्यात येणार आहे.