चक्कर मारण्याच्या नावाखाली दुचाकीच लांबवली

जळगाव : ओएलएक्स वेबसाईटवर दुचाकी विक्रीची जाहिरात दिल्यानंतर एकाने वाहनाची चक्कर मारतो, असे सांगून दुचाकी नेली मात्र बराच वेळ होवूनही संबंधित न परतल्याने फसवणूक झाल्याची खात्री होताच रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा
जळगाव शहरातील विवेकानंदनगर भागात अक्षय रमेश मोरे (22) हा तरुण वास्तव्यास आहे. तरुणाची त्याची दुचाकी (एम.एच.19 डी.एल.4598) ही विक्री करायची असल्याने त्याने ओलएक्स या ऑनलाईन वेबसाईटवर दुचाकीबाबतची माहिती दिली. 17 मे रोजी ओएलक्सवरील माहितीनुसार कुणाल राजपूत नामक एक तरुण रीक्षाने शहरातील वाघनगर परीसरात आला. दुचाकी खरेदी करायची असल्याने सांगत त्याने दुचाकी मालक अक्षय यास संपर्क साधला व जी दुचाकी विक्री करायची आहे, ती घेवून वाघनगर परीसरात यावयास त्याने सांगितले. अक्षय त्याची दुचाकी घेवून वाघनगरात पोहचला. दुचाकी खरेदी करायला आलेला कुणाल याने दुचाकी चालवून बघायची असे सांगितले. त्याच्यासोबत अक्षय हा सुध्दा मागे बसून गेला. त्यानंतर कुणाल याने पुन्हा दुचाकीचा स्पीड चेक करायचा असल्याचा बहाणा केला. व एकटाच दुचाकी घेवून गेला व पुन्हा परत आलाच नाही. दोन दिवस उलटूनही तरुण दुचाकी घेवून परत न आल्याने अक्षय याने गुरुवारी तक्रारीसाठी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवल्यानंतर कुणाल राजपूत व एक अज्ञात तरुण अशा दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक सुनील पाटील हे करीत आहेत.