जळगाव । घरातून कामाला जात असतांना एकाला चक्कर येवून पडल्याने नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मुकुंद नगर येथे झाले असून जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. राजेश त्र्यंबक अहिरे असे मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजेश अहिरे (वय-48, मुकुंद नगर) यांचे जिल्हा सामान्य रूग्णालयासमोर जयहिंद लॉण्ड्री नावाने दुकान असून भाऊ सुनिल अहिरे सोबत लॉण्ड्रीचे काम करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सकाळी दुकानाच्या कामावर जाण्याच्या तयारीत असतांना राजेश अहिरे यांना सकाळी 9 वाजेच्या सुमारास चक्कर येवून छातीत दुखायला लागल्याने त्यांना अत्यवस्थ वाटायला लागले त्यांना भाऊ सुनिल अहिरे यांनी तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी त्यांना मयत झाल्याची घोषणा केली. मयत राजेशच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई व भाऊ असा परीवार आहे.