चक्कर येवून पडल्याने मुक्ताईनगरानजीक दोघा परप्रांतीयाचा मृत्यू

0

मुक्ताईनगर : लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर गावाकडे निघालेल्या दोन मजुरांचा वेगवेगळ्या घटनेत चक्कर येवून पडल्याने मृत्यू झाला. मुंबईहून आजमगड व प्रतापगडकडे निघाले असतानाच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 46 वर ही घअना गुरुवारी दुपारी घडली.

चक्कर येवून पडल्याने मृत्यू
कळवा मुंब्रा येथून जळगावपर्यंत ट्रकमधून प्रवास केल्यानंतर उत्तरप्रदेशातील आजमगडला पायीच निघालेल्या रामसुमझ रामाधर (जफ्फरपूर, पोस्ट विषम आहरोली, आजमगड, उत्तर प्रदेश) याचा हरताळा फाट्याजवळील हनुमान मंदिर जवळच रस्त्यातच चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. घटना घडली त्यावेळी त्याच्या सोबत त्याचे दोघे चुलत भाऊ होते. त्यास कोथळीचे पोलिस पाटील व संजय चौधरी यांनी तत्काळ योगेश पाटील यांच्यासमवेत मुक्ताईनगर उप रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

दुसर्‍या घटनेत मजुराचा चक्कर आल्याने मृत्यू
दुसर्‍या घटनेत पती व पत्नी मुंबईहून पायीच गावाकडे निघाले असतानाच हॉटेल फ्लोराजवळ यदुनाथ राजन राम (भाषा, पोस्ट, जिल्हा प्रतापगड, उत्तर प्रदेश) याचा चक्कर येऊन खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील व नगरसेवक राजेंद्र हिवराळे यांनी दोन्ही मयत इसमांची आधार कार्डावरून माहिती काढत उत्तर प्रदेश प्रशासनाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. याप्रसंगी हरताळ्याचे प्रदीप काळे उपस्थित होते.