चक्क एकाच जातीचे ११५ सापाची पिले

शिरपूर – अर्थे बु. येथे मंगळवारी एकाच जातीचे ११५ सापाची पिले आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या सापाच्या पिल्लांना सर्पमित्र दिनेश बोरसे व रोहित माळी यांनी सुरक्षित बाहेर काढून नांदरडे जवळील जंगलात थंड पाण्याच्या जागी सोडून जीवदान दिले.
तालुक्यातील अर्थे येथील गिरीश माधवराव पाटील व नारायण तानका सनेर यांच्या घराच्या ओट्याखाली गटारीच्या कोपऱ्याला दगडाखाली एकाच जातीचे ८५ सापाची पिले असता नागरिक भयभीत झाले. अर्थे येथील जयेश सोनार यांनी लागलीच वाघाडी येथील जीवरक्षा वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सर्पमित्र दिनेश बोरसे यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोरसे व त्याचे सहकारी सर्पमित्र रोहित माळी यांनी तात्काळ अर्थे येथे येत एकाच दगडाखाली एकाच जातीचे ७० सर्पाचे पिले आढळून आल्याने बाहेर काढली. तसेच आजूबाजूच्या 2 भिंतीमधून १५ पिले सर्पमित्र दिनेश बोरसे व त्याचे सहकारी सर्पमित्र रोहित माळी अथक परिश्रम करून सुरक्षित बाहेर काढली. तसेच सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पुन्हा पिले निघत असल्याचा फोन आल्याने परत सायंकाळी त्याच ठिकाणाहुन ३० पिले निघाले. दिवसभरात जीवरक्षा वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सर्पमित्र दिनेश बोरसे व रोहित माळी यांनी अर्थे गावातून एकाच ठिकाणाहून ११५ पिलांना जंगलात थंड पाण्याचा जागेवर सोडून जीवदान दिले.
————
अर्थे येथे सापडलेली सापाची सर्व पिले पाणदिवड (checkered keelback watres sanke) जातीच्या सापाची आहेत. हा साप पूर्णपणे बिनविषारी असून या सापाची लांबी ५ फूटपर्यंत असते. त्यात मादी ही ५ फुटापर्यंत वाढते आणि नर हा ३ फुटापर्यंत वाढतो. या सापाची मादी एकावेळेस ९० ते ११६ अंडी देऊ शकत असल्याची माहिती जीवरक्षा वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सर्पमित्र दिनेश बोरसे यांनी दिली.