पाकिस्तानी दूतावासासमोर निदर्शने
वॉशिंग्टन : हेरगिरी आणि विध्वंसक कारवाया केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानमध्ये फाशीची शिक्षा झालेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या पत्नी आणि आईला दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे पाकिस्तानची जगात नाचक्की झाली आहे.
अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील पाकिस्तानी दूतावासासमोर इंडो-अमेरिकन आणि बलुच प्रांतातील लोकांनी एकत्र येऊन चप्पल चोर पाकिस्तान अशा घोषणा आणि फलक घेऊन पाकड्यांचा निषेध केला. 25 डिसेंबर 2017 रोजी कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी यांना त्यांची भेट घेण्यास पाकिस्तानने परवानगी दिली होती. मात्र यावेळी पाकिस्तानने जाधव यांच्या आईला मंगळसूत्र टिकली काढून टाकण्यास सांगितले. तसेच बूट, चप्पल काढून घेतले आणि त्यामध्ये चीप आहे असा खोटा आरोप करत ते परत दिले नाहीत. पाकिस्तानने दिलेल्या या वाईट वागणुकीची निंदा भारतासह इतर देशातील नागरिकांनी देखील केली आहे.