कोट्टायम-चर्चमधील सेक्स स्कँडल आणि बलात्कार प्रकरणात चार पादरींचा समावेश आहे. त्यापैकी दोन पादरींनी आज थिरवल्ला जिल्ह्यातील स्थानिक कोर्टापुढे शरणागती पत्करली. कोर्टापुढे शरणागती पत्करली आहे. केरळच्या कोट्टायम मध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. स्थानिक पोलिसांनी चर्चमधील सेक्स स्कँडलनंतर चार पादरींविरोधात बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा नोंदवण्यात आला. एका पीडितेने आरोप केला होता की चार पादरींनी तिच्यासोबत बलात्कार केला आणि त्यानंतर तिला ब्लॅकमेलही केले.
या प्रकरणानंतर केरळमधील चर्चने पादरींना कोर्टापुढे शरणागती पत्करण्यास सांगितले होते. त्यानुसार दोन पादरींनी आज थिरवल्ला जिल्ह्यातील स्थानिक कोर्टापुढे शरणागती पत्करली. जे. के. जॉर्ज आणि सोनी वर्गीज अशी या दोघांची नावे आहेत. आपल्या हातून घडलेल्या चुकांची कबुली देण्यासाठी महिला आली होती. त्यानंतर चार पादरींनी तिच्यावर बलात्कार केला असा आरोप पीडित महिलेच्या पतीने केला होता. या प्रकरणात पोलीस तपास सुरू होता. पीडित महिलेच्या पतीने केलेल्या आरोपानंतर चर्चने या सगळ्यांना बडतर्फ केले होते. चर्चमध्ये या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू आहे.
केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये महिलेच्या पतीने तिच्यासोबत झालेल्या अन्यायाची कहाणी कथन केली आहे. या चार पादरींपैकी एकाने लग्नाच्या आधी माझ्या पत्नीचे लैंगिक शोषण केले असाही आरोप पीडितेच्या पतीने केला आहे.