चौकशी करण्याची मागणी
हे देखील वाचा
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने नुकतीच चर्होली-लोहगाव रस्त्यासाठीच्या दोन टप्प्यांसाठी तब्बल 90 कोटीपेक्षा जास्त रक्कमेला मंजुरी दिलेली आहे. रस्त्याच्या पहिल्या टप्प्यासाठी 46 कोटी 76 लाख रुपये तर दुसर्या टप्प्यासाठी 45 कोटी 88 लाख रुपये या रस्त्याच्या कामासाठी महापालिका अदा करणार आहे. त्यामुळे विनाकारण महापालिका करदात्या शहरवासीयांच्या खिशावर दरोडा टाकत आहे. ठराविक परिसरातीलच या रस्त्यासाठी एवढा खर्च का? याबाबत बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिका अधिकारी व कंत्राटदार यांनी संगनमताने महापालिका लुटण्याचा प्रकार चालवला आहे. या कामात मनपा आयुक्त, अधिकारी, पदाधिकारी व ठेकेदार यांनी रिंग करून भ्रष्टाचार केला आहे. आयुक्तांनी तटस्थपणे व पारदर्शकपणे या प्रकरणाची चौकशी करावी. चर्होलीतील या रस्त्याच्या कामांच्या निविदा रद्द करून फेरनिविदा काढावी. अपेक्षित खर्चाचे पुनर्निरिक्षण करावे. भ्रष्टाचाराशी संबंधित सर्वांची चौकशी करावी, असे संतोष निसर्गंध यांनी या निवेदनात सांगितले आहे.