‘Chalein’ अ‍ॅप दररोज ये-जा करणार्‍यांसाठी उपयुक्त

1

आजच्या महागाईच्या युगात सर्वसामान्यांना गाडी घेणे परवडत नसल्याने वाहतुकीच्या समस्यांवर उपाय म्हणून पुष्पोत्तम टेक्नॉलॉजी प्रा.लि. कंपनीने चलें नावाचे अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपमुळे आपण आपला प्रवास आपल्या सोयीनुसार ओळखीच्या आणि भरवशाच्या व्यक्तीसोबत कारपूल किंवा राइड शेअरचा वापर करू शकतो. प्रवास करताना बर्‍याचदा असे होते की आपल्या परिसरातील लोक आपल्याच नेहमीच्या ठिकाणाहून ये-जा करतात आणि आपल्याला माहीतही नसते, बहुतेकांकडे गाड्या असतात आणि नसतात, पण एकमेकांना अपरिचित असल्यामुळे आपण एकमेकांच्या प्रवासातही उपयोगात नाही येऊ शकत आणि म्हणूनच बहुतेक जण महत्त्वाचा वेळ, पैसे वाया घालून ध क्के खात सार्वजनिक वाहनांचा वापर करतात. हे नेहमीच्या ठिकाणाहून ये-जा करणार्‍या प्रवाशांना व खासगी वाहनधारकांना सोयीचे ठरणार आहे.

आपल्या आगामी प्रवासाची थोडक्यात माहिती नोंदवून एकमेकांशी राइडशेअर करू शकतात. यामुळे प्रवाशांना बस स्टॉप, रेल्वे स्टेशनवर तासन2तास उभे राहून वाहनांची वाट न बघता सोयीच्या ठिकाणी आणि वेळेवर वाहन मिळू शकेल आणि तसेच वाहनधारकांनाही आपल्या ओळखीतले आणि आपल्याच नेहमीच्या ठिकाणाहून ये-जा करणारे प्रवासी मिळाल्यामुळे इंधनाचा खर्च कमी होण्यास मदत होते. ‘Chalein’ (Carpool /RideShare) च्या मदतीने Rideshare /carpool केल्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होईल, शिवाय वेळ आणि पैशांबरोबरच इंधनाची बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. रस्त्यावरील ट्राफिक आणि अपघाताचे प्रमाणसुद्धा कमी होईल. Chalein च्या मदतीने RideShare केल्यामुळे आपल्या फायद्याबरोबरच पर्यावरणाचाही बचाव/संरक्षण होण्यास मदत होईल. अ‍ॅपचे वैशिष्ट्य आणि फायदे आहेत सोपे आणि जलद गतीने प्रवासाची नोंद करणे (जसे प्रवासाची वेळ, ठिकाण ज्यासाठी आपण जीपीएस लोकेशनची ही मदत घेऊन शकतो) प्रवासाची माहिती भरल्यानंतर अ‍ॅप लगेच तुम्हाला तुमच्या ठिकाणाहून आणि तुमच्या वेळेनुसार वाहनधारकांची किंवा प्रवाशांची यादी सादर करेल. वेळोवेळी तुमच्या प्रवाशाशी मिळतीजुळती प्रवास करणार्‍या व्यक्तीची सूचना देत राहील.

अ‍ॅपमध्ये आपण लगेच वाहनधारकाशी किंवा प्रकाशाची माहिती बघू शकतो. अ‍ॅपमध्ये ग्रुप्स आणि चाट फीचर असल्याने आपण लगेच वाहनधारकाशी किंवा प्रकाशाशी कनेक्ट होऊ शकतो. दैनंदिन प्रवास करणार्‍या प्रवाशासाठी अत्यंत उपयोगी. जवळ पास 30-100 ट3के वेळेची, पैशांची आणि इंधनाची बचत.रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होईल, ज्यामुळे इंधनाची बचत होऊन,प्रदूषण, अपघात कमी होतील. अ‍ॅपमुळे आपण आपल्या फेसबुक, गूगल फ्रेंड2सशी कनेक्ट राहू शकतात. राइडशेअर केल्यामुळे आपल्या फायद्या बरोबरच पर्यावरणाचाही बचाव होण्यास मदत होईल.