यावल : तालुक्यातील दहिगाव येथील 20 वर्षीय विवाहिता चहा करीत असतांना भाजली. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली. निकीता अजय सोनवणे ही विवाहिता चहा करताना 20 टक्के भाजली गेली. तिच्यावर यावल ग्रामीण रूग्णालयात डॉ. रश्मी पाटील, आरती कोल्हे यांनी उपचार केले. सद्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.