चांगला समाज निर्माण करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे

0

चाकण (प्रतिनिधी) – स्वंतत्रता, समता व बंधूभाव या गुणांचा अवलंब करून एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी सर्वानी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आमदार सुरेश गोरे यांनी सांगितले. स्वच्छता, पाणी वाचवा, वीज वाचवा तसेच पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 69 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त स्व. गुलाबराव गोरे प्रतिष्ठान संचलित ज्ञानवर्धिनी विद्यालय, भामा इंग्लिश मिडीयम स्कुल आणि ज्ञानवर्धिनी ज्युनिअर कॉलेजमध्ये आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर यांच्या वतीने ज्ञानवर्धिनी विद्यालय व भामा इंग्लिश मिडीयम स्कूलला एक कॉम्युटरचा संच देणात आला. गजानन पापळे यांनी तो शाळा व्यवस्थापनाकडे सुपुर्द केला. यावेळी गोरे यांच्या हस्ते त्यांना सन्मानीत करण्यात आले. तसेच सन्मान पत्र देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. नगराध्यक्षा मंगल गोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे, विकास गोरे, अंकुशराव पवार, विष्णू गोरे, नितीन गोरे, प्रकाश भुजबळ, शांताबाई गोरे, दत्ता जाधव, योगेश गोरे, संतोष सोनावळे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.