चांदा ते बांदा योजनेचा आढावा !

0

मुंबई:- चांदा ते बांदा योजनेचा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी आढावा घेतला तसेच योजनेतील कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने आणि वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. चंद्रपूर आणि सिंधुदूर्ग या दोन जिल्ह्यात हा पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येत असून याच्या यशस्वीतेनंतर संपूर्ण राज्यभरात हा पॅटर्न राबविला जाणार आहे. त्यामुळे योजनेतील विविध विकास कामांना, रोजगार निर्मिती करणाऱ्या उपक्रमांची आखणी आणि अंमलबजावणी ही वेळेत, व्यवस्थित आणि पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे असे मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.