Crime against 10 social media account holders for spreading child pornography जळगाव : चाइल्ड पोर्नोग्राफीसंबंधी व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारीत केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांनी सोशल मीडियातील वेगवेगळ्या 10 खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली.
दहा खातेधारकांविरोधात गुन्हा
जळगाव सायबरचे सेलमध्ये कार्यरत असलेले पोलिस कॉन्स्टैबल सचिन रमेश सोनवणे यांनी फिर्याद दिल्यानुसार 17 नोव्हेंबर 2020 ते 30 जानेवारी 2021 पर्यंत वेळोवेळी आकाश माळी, विशाल बारी, हेना शेख, राज चव्हाण, अभिराम नायर, अजय कुमार, विशाल सोनवणे, माणिक, शोभा असे युजर नेम असलेल्या दहा खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.