शहादा : चाकुचा धाक दाखवित तरुणीवर जबरी बलात्कार करणार्या तरुणाविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 15 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास धडगाव तालुक्यातील बोरवण येथील 18 वर्षीय युवतीस ह्याच गावातील रहिवाशी टाईगर उर्फ कोक्या कोपा पावरा याने तरुणीच्या घरात प्रवेश करुन तिला चाकूचा धाक दाखवित तिच्यावर जबरी बलात्कार केला. कोणास काही सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. म्हणून धडगाव पोलिसात पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरुन तरुणाविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोसई मोरे करीत आहेत.