भुसावळ- शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल सायलीत किरकोळ कारणावरून दोघांवर चाकू हल्ला केल्याची झाल्याची घटना शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेनंतर आरोपी अजय गोडाले पसार होता. मंगळवारी तो न्यायालयात जामीन करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर संशयीत न्यायालयाबाहेर येताच त्याच्या मुसक्या बाजारपेठ पोलिसांनी आवळल्या होत्या. बुधवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
न्यायालयाबाहेर आवळल्या मुसक्या
हॉटेल सायलीवर तक्रारदार आशिष दिलीप जाधव (24, शिवाजी नगर, डी.एल.हिंदी विद्यालयाजवळ, भुसावळ) हे मित्र जॉय मॅथ्यू व भाऊ आकाश जाधव हे जेवण करीत असताना संशयीत आरोपी अजय गोडाले हा तेथे आला व त्याने जॉयच्या हातातील मोबाईल घेतला तो परत द्यावा, असे आशिषने म्हटल्याने आरोपी गोडालेने आपल्याजवळील चाकू डाव्या काखेत मारला. दोघांची झटापट सुरू असताना भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या आकाश जाधवच्या उजव्या हाताच्या कामेवरही दुखापत झाली होती. या घटनेनंतर संशयीत पसार झाला होता. संशयीत मंगळवारी न्यायालयात येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, बाजारपेठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत चव्हाण, योगेश माळी, नरेंद्र चौधरी, ईरफान काझी आदींनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्यास बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.